पं. लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांची परंपरा

पं. लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांची परंपर


शं. बा. परमेकर , लोकप्रभा साप्ताहिक (१९७८)      पं. लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्या निधनाने भारतीय संगीताची एक सखाच अकस्मात मोडून पडली आहे. जयपूरचे नाममहात्म्य्वच इतके जाज्ज्वल्य आहे कि, या नामोच्चाराबरोबरच साहित्य, संगी, नाट्य व शिल्प यांची एक अजोड प्रतिमा डोळ्यांसमोर ठळकपणे उभी राहते. ज्या ग्यान व कला महर्षीनी आपल्या व्यासंगी संगीत जीवनाने या भूमीला पुनीत केले, त्यात लक्ष्मण प्रसादजिंची गान कारकीर्द एका स्वतंत्र तेजानेच प्रकाशित झाली होती. त्यामुळेच लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले म्हणजे अभिजात साहित्याने रसरसलेले भावमधुर गायन हे समीकरण काही केल्या मनातून ढळत नाही.

      या महान गायकाला ऐकण्याचा मला एकदाच सुयोग आला होता. परंतु त्या एकाच गाण्यावरून त्यांना मिळालेली ‘गुनिगंधर्व’ हि पदवी किती सार्थ होती याच्या मनोमन प्रत्यय आला. त्या दिवशी त्यांचा पूर्वा कल्याण एका आगळ्याच वैशीष्ट्याने मनात ठसला. तेय वैशीष्ट्य मन्ह्जे काव्य, स्वर व लय यांचा मधुर संयोग. त्या वैशीष्ट्यपूर्ण गायकीत स्वरांचे ओज कायम राहून, अस्थायी अंतऱ्याच्या समतोलाने व साहित्यातील शब्दांच्या स्पष्ट उच्चारामुळे, चीजेतील आशयही मनावर ठसतो. त्यांच्या त्या एकाच मैफिलीने मनावर उमत्लेलेला हा ठसा.

      लक्ष्मणप्रसादजिंचा जन्म १५ जानेवारी १९१५ रोजी गुजराथमधील ध्रांगध्रा संस्थानात जयपूर बिकानेरच्या राजभट्ट घराण्यात झाला. वडील बलदेव प्रसाद हे इंदूर संस्थानात दरबारी गायक होते. लक्ष्मणप्रसाद आठ वर्षांचे असतानाच आईवडील निवर्तल्यावर त्यांचे पालन पोषण वडील बंधू मुरलीर्प्रसाद यांनीच केले. घरातील संगीत वातावरण व वडिलांकडून मिळालेले प्राथमिक शिक्षण या शिदोरीवरच ते वडीलबंधूंबरोबर कानपूर येथील श्रीकृष्ण थिएटर कंपनी या नाट्यसंस्थेत काम करू लागले. कोणत्याही गायकाला एकदा ऐकल्यानंतर त्याची हुबेहूब नक्कल करणे, हि त्यांना उपजत देणगी झाली होती. उत्तम अभिनय व तिन्ही सप्तकात सहजतेने संचार करणारा सुरेल पल्लेदार आवाज याच्या बळावर त्यांच्या भूमिका सुरुवातीपासूनच लोकप्रिय होऊ लागल्या. या वैशीष्ट्यामुलेच या कंपनीच्या शिरी फरहाद, लैला मजनू या नाटकातील फरहाद व मजनू या त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजला होत्या. पुढे नाट्यव्यवसायात त्यांना इतका भरमसाट पैसा मिळू लागला कि, त्याच्या जोरावर त्यांनी एक नाटक कंपनी विकत घेतली. त्याचवेळी मान्ह्जे जवळ जवळ वयाचा अठाराव्या वर्षी त्यांचा विवाह जयपूर दरबार गायक व नर्तक पं. बद्रीप्रसाद यांच्या कन्येशी झाला. मात्र या नात्य व्यवसायात लक्ष्मणप्रसादजींचा मूळ गायाकांचा पिंड जास्त दिवस रामू शकला नाही. त्यांनी काही दिवसातच हरिदास गोस्वामी (गुसांई) परंपरेतील लाडली महाराज (कुंवरश्यामजी) यांचे शिष्य गुट्टू गोपालजी यांचे शिष्यत्व पत्कारले.

      हरिदास परंपरेच्या दोन सखा असून गोपाल गायक, गुंसाई पन्नालालजी, लाडली महाराज या परंपरेने चालत आलेली ४०० – ५४० वर्षांची गोस्वामी (गुंसाई) परंपरा व दुसरी तंसेनापासून निर्माण झालेली ‘सेनिया’ हि मुसलमानी परंपरा. गुरु गुट्टू गोपालजी यांजकडून त्यांनी धृपद, धमार, ख्याल व धबरू अंगाच्या (धृपद अंगी चलनाने युक्त मध्यालयीन बंदिश) गायाकीचेय बरेच शिक्षण घेतले. गुरु गुट्टू गोपालजींकडून मिळालेल्या सक्त तालमीमुळे वयाच्या २७- २८ व्या वर्षीच त्याची त्यावेळच्या मोठमोठ्या गवय्यात गणना होऊ लागली. उत्स्फूर्त काव्यरचना करण्याचा भट्ट घराण्याचा वारसा व त्या योग्य स्वरलयाच्या सायुज्याने ती नटविण्यांची प्रतिभा यांची गुंफण करून लक्ष्मणप्रसादजींनी आपली एक स्वतंत्र शैलीच बनविली होती.

      साधारण १९४४च्या सुमारास दिल्ली आकाशवाणीवर त्यांची म्युझिक सुपरवायझरमांहून नियुक्ती झाली. परंतु त्यांच्या गानप्रकृतीला तेथील शासकीय वातावरण मानवले नाही. त्यामुळे त्यांचे चुलत सासरे सीने-म्युझिक डिरेक्टर खेमचंद प्रकाश यांनी त्यांना मुंबईत आणले. परंतु मुंबईत आल्यानंतर केवळ ८-९ महिन्यातच खेमचंद प्रकाश यांचे निधन झाले. पुढे अशा असहाय्य स्थितीच ते सहज पान खाण्यासाठी म्हणून गेले असतानाच जवळच एक गाण्याची मैफल सुरु असल्याचा त्यांना सुगावा लागला. पंडितजींनी लगेच तीथे प्रवेश मिळविला. त्या ठिकाणी चतुर्भुज राठोड, पं. राजारामबुवा शुक्ल, पं. मुरली मनोहर शुक्ल, दशरथ पुजारी, रमाकांत म्हापसेकर, वगैरे गायक वादकांची मैफल सुरु होती. पंडितजींनी तीठेय आपली वर्णी लावल्यावर आपण काय गाणार, असे तेथील आयोजकाने विचारताच आपान एखादी गझल किंवा कव्वाली गाऊ असं त्यांनी सांगताच मंडळींनी नाकें मुरडलीच (याही प्रकारात लक्ष्मण प्रसादजी कूछ कम नही थे) पाहूया तर खरं हा नवा पाहुणा काय गातो ते या तुच्छतेनेच त्यांना गाण्याची परवानगी मिळाली. मात्र त्यांनी मध्यमात तंबोरा मिळविताच तेथील बुजुर्ग मंडळींनी लगेच खुणगाठ बांधली की हा कुणी साधा गायक नाही. त्यांच्या लयदार सुरेल आवाजात माळकंसची भारदस्त डौलदार बीलंपट सुरु होताच या नव्या पाहुण्याची गानप्रतिमा त्या सभागृहात तेजस्वीतेने उजळली. या मालकंसचा प्रभाव इतका जबरदस्त पडला की, त्या ठिकाणींच पं. राजाराम शुक्ल व पं. मुरली मनोहर शुक्ल या दोघांनी लक्ष्मणप्रसादजींचे शिष्यत्व पत्करले. पं. राजाराम शुक्ल हे त्या आधीच बरीच वर्षे तालीम मिळालेले पं. ओंकारनाथ थाकूरांचे शिष्य होते. हि घटना लक्ष्मणप्रसादजींच्या वीद्वत्तापूर्ण व सम्रीद्ध गायकीच्या संदर्भात बरीच बोलकी असून, पं. राजारामबुवा यांनी स्वत:च सांगितलेली ही १९५-०- ५१ सालची घटना आहे.

      लक्ष्मणप्रसादजींना गुनिगंधर्व हि पदवी त्या आधीच जालंदर कॉन्फेरन्समध्ये मिळाली होती. या कॉन्फेरन्सला एक अप्रसिद्ध गायक म्हणून गेलेल्या लक्ष्मण प्रसादजींना ती रात्र अक्षरस: गोड्याच्या ताबेल्यातच काढावी लागली होती. परंतु त्या गडद काळोख्या रात्रीच्या उदरात त्यांच्या उज्ज्वल भविष्य काळाच्या उष:काल लपून असल्याची त्यांना त्यावेळी सुतराम कल्पना नव्हती. दुसर्या दिवशीच्या मध्यान्ही त्यांनी गायिलेल्या शुध्द सारांगात त्यांची गानप्रतिभा मध्यान्हीच्या तेजस्वीतेनेच उजळून निघाली. त्या दिवशी त्यांना शुद्ध सारंग असा काही रंगला की, त्या रात्रीचे आधी ठरवलेले इतर सर्वच कार्यक्रम रद्द होऊन ती रात्र पंडीतजींच्या गाण्यानेच जागविली गेली. त्या रात्रीच त्याचा सत्कार होऊन हरिवल्लभ मेळाव्याच्या महंतांकडून त्यांना मानपत्र व ‘गुनिगंधर्व’ हि पदवी मिळाली.

      लक्ष्मणप्रसादांच्या प्रतिभासंपन्न व विद्वत्तापूर्ण गायकीचा आणखी एक किस्सा या ठिकाणी देण्याचा मोह आवरता येत नाही. हि आठवण उत्तर हिंदुस्तानातील एका कॉन्फेरन्समधील आहे. या कॉन्फेरन्समध्ये दिलीपचंद्र वेदि, बडे गुलाम ली खां, अमीर खां वगैरे मोठमोठया गायकांची हजेरी लागली होती. या कॉन्फेरन्समध्ये, मेघ रागाबद्दल एक सुवर्णपदक जाहीर झाले होते. जो कोणी या रागाबद्दल विस्त्रित माहिती सांगून तो गाऊन दाखवील व ज्याची माहिती व गायन सर्वोत्कृष्ट ठरेल तोच या सुवर्ण पदकाचा मानकरी ठरणार होता. अनेक बुजूर्ग गायकांच्या त्या मेळाव्यात या स्पर्धेसाठी फ़क़्त दिलीपचंद्र वेदि व लक्ष्मणप्रसाद या दोघानीच नावे दिली. लक्ष्मणप्रसादनी दिलीपचंद्र वेंदींशी या रागाबद्दल आधी थोडीशी चर्चा केली. सारांगचीच स्वरावली असणारा हा राग हिंदू व मुसलमान असा दोन्ही पद्धतींनी गायीलाजातो. हिंदू पद्धतीप्रमाणे स्वर विस्ताराचा क्रम बदलून सारंगच्या अंगानेच हा राग गायीला जातो. तर मुसलमानी पद्धतीप्रमाने, कोमल गांधारच्या विशिष्ट आंदोलनाने तोः गायीला जातो. या चर्चेनंतर लक्ष्मणप्रसाद सरळ आपल्या निवास्थानी आले वा लगेच त्यांनी हिंदू पद्धतीप्रमाणे (गांधार वर्ज करून) या मेघ रागावरएक चीज बांधली. दुसऱ्या दिवशीच्या स्पर्धेत, त्यांची पाळी आल्याबरोबर त्यांनी या मेघरागावर प्रात्यक्षिकासह तौलनिक विवरण करून तैयार केलेली चीज गाऊन दाखविली, शेवटी आपली हिंदू पद्धतीच कशी चांगली आहे, हे तेथील विध्वान मंडळींना पटवून दिले. या ठिकाणी आपले मूळ विशुद्ध भारतीय संगीत मुसलमानांनी बिघडविले या स्वामी विवेकानंदांच्या एकेकाळच्या उद्गाराचा शोध मिळतो. शेवटी, सुवर्ण पदकाने विजयश्रीची माळ लक्ष्मण प्रसादजिंच्याच गळ्यात पडली. मेघ रागातील तीन तळातील तो चीज खाली ऊद्धृत केली आहे :-

स्थायी : मोरे पिया परदेस छाये |
एरी आली मोहे कछु न सुहावे ||
अंतरा : तरपत रैन निंद नहीं आवे |
बिरहा ताहुपे अतही सतावत |
कहां करूं ‘लक्ष्मण’ अब चैन न आवे ||

      प्रतिभाशाली गायकी बरोबरच शिघ्रकवित्व हे पंडितजींना निसर्गतःच प्राप्त झालेय्लेय दुसरे प्रसाद चिन्हच होय. त्यांनी आपल्या काव्य प्रतिभेने भारतीय राग्रागीन्यांवर आपल्या व्यक्तिमत्वाचा एक वैशीष्ट्यपूर्ण ठसाच उमटविला होता. या काव्य प्रतिभेवर भक्तिरसाचा इतका जबरदस्त प्रभाव पडला होता कि, त्यांची प्रत्येक रचना जणू या भक्तिरसाच्या ओलाव्यानेच पुनीत झाल्याचा प्रत्यय येतो.

      ज्या संतसज्जनांच्या निकट सहवासाने व त्यांच्या उप्देशामृताने लक्ष्मण प्रसादजींना आध्यात्माप्रवण काव्यांची सतत प्रेरणा मिळत गेली, त्यांच्या मालिकेत गुरु मास्तरामजी वेदांती (दिल्ली), श्री. बाबा गुट्टू गोपालजी, संगीत गुरु (दिल्ली), भक्त शिरोमणी मुन्शी मथुरा प्रसादजी (जयपूर) वागैरे जवळ जवळ पंधरा गुरुजनाचा समावेश होतो. यातील ज्या एका महान संताचा लक्ष्मणप्रसादजींना कृपा प्रसाद लाभला होता व ज्यांच्या प्रेरणेने लक्ष्मणप्रसादजींच्या गायकीला मुंबईत मानमान्यता मिळून या कालानग्रीत त्यांच्या चतुरस्त्र गायकीचे खरे चीज झाले, ते मन्हजे, माटुंगा निवासी प्रातःस्मरणीय बाबा भगवानदास. बाबा स्वतः संगीतप्रेमी असल्यामुळे त्यांच्या आश्रमात किती तरी नामवंत गायकगायिका, नर्तक व वादकांनी हजेरी लावली आहे. अशा कलाकारांची संख्या १२५च्या वर जाईल. परंतु बाबांच्या खास आज्ञेने त्या आश्रमातील एक जागा लक्ष्मणप्रसादजींनी व्यापून त्या ठिकाणी त्यांच्या संगीत सेवेची दर रविवार संध्याकाळी ६ ते ९ हि वेळ कधी चुकला नही. अशा रीतीने त्यांना बाबांचा ८ वर्षांचा सहवास लाभला.

      १९५७ साली बाबांचा परलोकवास झाल्यावरही, त्यांचा हा सेवाक्रम असाच चालू राहिला. आपल्या पिताजींच्या मृत्युनंतर चिरंजीव गोविन्द्प्रसादांनीही हि प्रथा अशीच चालू ठेवली.

      संगीताप्रमाणेच त्यांच्या या आध्यात्मिक जीवनाचा परिपाक म्हणजे त्यांनी स्वयंप्रेरणने लिहिलेला ‘आत्मदर्शन’ हा छोटासा ग्रंथ. हा ग्रंथ वाचल्यानंतर त्यांच्या शेकडो अध्यात्मप्रवण काव्य राचनाना शोधबोध मिळतो.

      रागवाचक स्वराशय कोणत्याही तऱ्हेने विकृत ना करतां श्रोतुवर्गाला आपल्या लयकारीच्या चमत्कृतींनी सारखे गुंगत ठेवण्याचे अजब सामर्थ्य या गायकीत दिसून येते. या गायकीतील वैशीष्ट्य हेच कि, मूळ छंद्युक्त काव्यार्थाचा कोणत्याही तऱ्हेने संकोच ना करता, त्याला ललक, गमक, ग्रहभेद, मींड, मुरकी, कण, उपकण, तानप्रस्तर वगैरे अलंकारांनी नटविलेले धृपद अंगी आलाप, सुसंगत बढत, जोड अंग, वक्रगती तान, सरगम, तराणा यांनी युक्त असलेल्या त्यांच्या स्वर व लयप्रधान गायकीचा मूलाधार आपल्याला मूळ प्रबंध गायकीत सापडतो. या विषयावरील पं. गोविंदप्रसाद, पं. राजाराम शुक्ल, पं. मुरली मनोहर शुक्ल या त्रीवार्गाबरोबर झालेल्या चर्चेत मला हेच दिसून आले कि, एके काळची प्रबंध गायकी आता लुप्त झाली आहे, हे मत तितकेसे खरे नसून त्या प्रबंध गायकीचे उत्क्रांत स्वरूपच या गोस्वामी (गुसांई) परंपरेत व ती परंपरा आपल्या स्वतंत्र प्रतिभेने वृद्धिंगत करणाऱ्या लक्ष्मणप्रसादजींच्या गायकीत सापडते. १००० चिजा पंडितजींनी स्वतः बांधल्या आहेत. त्यांमधून कितीतरी भारतीय रागरागिण्या आशयपूर्ण भावरसांनी संपन्न झाल्या आहेत. लक्ष्मण प्रसादजींच्या या चिजांचा मुखडाच त्यांनी असा बांधला आहे की, त्या चिजांत रागवाचक तान बंधन गायकीचा योग्य समावेश झालेला दिसून येतो. कोणतीही चीज बांधताना त्यातून रागाची मौलिकता नष्ट होता कामा नये, यावर त्याचा कटाक्ष असे. चीजेमुळेरागाचे व्यक्तिमत्व साकारले जाते, अशी धारणा असे. रागाने असा तऱ्हेने रसोत्पादनाचे विविध पैलू पाडू, शकणार्या त्यांच्या रचना कौशल्याची दीक्षा त्यांची आपल्या शिष्याव्रुंदांनाही देऊन ठेवली आहे. गोविंदप्रसाद, राजाराम शुक्ल, मुरली मनोहर शुक्ल वगैरे त्यांच्या शिष्यावरांनी अशा कितीतरी चीजा स्वतंत्र रचना कौशल्याने बांधल्या आहेत.

      विध्यार्थ्याला प्रत्यक्ष तालीम देत असता बिशिष्ट चीजेतील मर्म त्याच्या अंतरंगात कसं पेरलं जाईल याची ते फारच काळजी घेत असत.

      लक्ष्मणप्रसादजी धृपद, ख्याल, टप्पा, ठुमरी, त्रीवट, चतुरंग, होरी, भजन, तराणा हे प्रकार जसे उत्तम रीतीने गात तसेच ते गझल हि हाही प्रकार गात. लक्ष्मणप्रसादजी नर्तक नसले तरी नर्तन हा परंपरेचा उपालंकार मानला जातो. वडील व श्वसुर हे दोघेही नर्तक, त्यामुळेच त्यांना नृत्याची चांगलीच जाण होते. आणि म्हणहूनच तबला वादनात ते अत्यंत प्रवीण होते.

      लक्ष्मणप्रसादजींच्या शिष्य परंपरेतील प्रमुख म्हण्जे त्यांचे चिरंजीव पं. गोविंदप्रसाद, पं. राजाराम शुक्ल, पं. मुरली मनोहर शुक्ल, सुप्रसिध्द संगीत दिग्दर्शक कमलाकर भागवत, पद्माकर कुलकर्णी, वसंतराव कादणेकर, गोपीनाथ वाळके, मालती पांडे, सुनंदा जोग, कमाल बारोट, सीने कलावंत मिनू पुरषोत्तम, नीता फडके, मोहना खरे, कमला शिष्टा, अनिमा रोय वगैरे. त्यांच्या बंदिशी गाणाऱ्या मंडळीत माणिक वर्मा, लक्ष्मी शंकर, शोभा गुर्टू, सरला भिडे, सुधा मल्होत्रा, शारदा, नलिनी मुळगावकर या गायिकांचा समावेश होतो.